आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या मुलाजवळ आहे हे खास टॅलेंट, बॉलिवूडमध्ये डेब्यूची मिळाली होती संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म डायरेक्टर महेश मांजरेकरने अमितला फन अनलिमिटेड (एफयू) फिल्मची ऑफर दिली होती. - Divya Marathi
फिल्म डायरेक्टर महेश मांजरेकरने अमितला फन अनलिमिटेड (एफयू) फिल्मची ऑफर दिली होती.

मुंबई- राज ठाकरेचा मुलगा अमित ठाकरेचा सोमवारी साखरपुडा झाला. विशेष म्हणजे अमितच्या साखरपुड्या दिवशी राज ठाकरे आणि शर्मिला यांच्या मॅरेज अॅनिवर्सरी होती. अमित आपल्या लहानपणीची मैत्रिण मिताली बोरुडेसोबत लग्न करत आहे. अमितने आपल्या पित्याचे म्हणणे ऐकत एका फिल्मची ऑफर धुडकावून लावली होती. 

 

या फिल्मची मिळाली होती ऑफर-

 

- फिल्म डायरेक्टर महेश मांजरेकर अमित यांना घेऊन एक फिल्म बनवू इच्छित होते. जेव्हा त्यांनी याबाबत राज ठाकरेंना विचारले तेव्हा त्यांनी साफ नकार दिला. महेश आपली फिल्म 'एफयू' मध्ये अमितला घेऊ इच्छित होते.
- या मूव्ही म्यूजिक लाँच दरम्यान राज ठाकरेंनी सांगितले होते की, एकदा महेशचा फोन आला आणि त्याने अमितला आपल्या मूव्हीत घेत असल्याचे सांगितले. मात्र, राज यांनी चित्रपटाची माहिती घेतली आणि त्यास नकार दिला. अमित ठाकरेचे आजोबा श्रीकांत ठाकरे म्यूजिशियन होते तर, बाळासाहेब ठाकरे यांनाही हिंदी आणि मराठी फिल्ममध्ये खूप इंटरेस्ट होता. 

 

अमितजवळ आहे खास टॅंलेंट-

 

- पित्याप्रमाणेच अमित सुद्धा स्केचिंग करतो. तो आपल्या पित्यापेक्षाही खूपच चांगले स्केचिंग करतो. अमितने अमिताभ बच्चनपासून ते लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटिजची स्केचेस काढली आहेत. ही स्केचेस अमित अनेकदा सोशल साईटवर शेयर करतो.

 

आजारी अमितची मितालीने केली होती देखभाल-

 

अमित आणि मिताली लहानपणापासून एकमेंकाना ओळखतात. मिताली पेशाने एक फॅशन डिझायनर आहे. मीडिया रिर्पोट्सनुसार, अमित ठाकरे जेव्हा गेल्या वर्षी मोठ्या आजाराला तोंड देत होता तेव्हा त्याची देखभाल मितालीने केली होती. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, अमित ठाकरेंशी संबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...