आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रामा केअर सेंटरमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा, प्रशासनाचा गलथानपणा आला समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रुग्णांना सरकारी हाॅस्पिटलमधील गलथान कारभाराचा फटका बसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये रुग्णांना अनेकवेळा आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. एका सरकारी हाॅस्पिटलमध्ये उंदरांनी रुग्णाचा डोळा कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रशासनास जाब विचारत चांगलाच गोंधळ घातला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार एका युवकाचा अपघात झाला होता त्याच्या मेंदूतील रक्त गोठले होते. त्याला उपचारासाठी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्याला आयसीयूतून जनरल वाॅर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. मात्र रात्रीच्या वेळी एका उंदराने त्याचा डोळा कुरतडला. युवकाच्या वडिलांनी सकाळी त्याचा डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले तसेच शरीरावर आणि अंथरुणावर रक्ताचे व पडलेले आढळले. 

 

रुग्णाच्या वडिलांनी सांगितले, मुलाला आईसीयूमधून शिफ्ट करताना आम्ही जनरल वार्डमध्ये उंदीर असल्याचे पाहिले होते. उंदराने माझ्या मुलाचा डोळा कुरतला आहे पण प्रशासनाने यावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. 

बातम्या आणखी आहेत...