आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील वरळीत ११,७४४ कोटींतून ९३ वर्षे जुन्या चाळीचे पुन्हा बांधकाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाता अशी - Divya Marathi
अाता अशी

मुंबई- मुंबईतील वरळी परिसरातील ९३ वर्षे पूर्वीच्या चाळीला पुन्हा विकसित केले जाणार आहे. मुंबई हाउसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच म्हाडाने हे कंत्राट टाटा प्रोजेक्टच्या कन्सोर्टियमला दिले आहे. हे कंत्राट ११,७४४ कोटी रुपयांचे आहे. हा भारतातील सर्वात मोठा रहिवासी आणि व्यापारी रि-डेव्हलपमेंट प्रकल्प असल्याचे मानले जात आहे. यामुळे या चाळीत राहणाऱ्या १०,००० पेक्षा जास्त कुटुंबीयांना फायदा होणार आहे. 


सरकारी नोंदीमध्ये या चाळीचे नाव "बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट रेसिडेन्शियल अँड कमर्शियल सोसायटी' असे आहे. मुंबईमध्ये इंग्रजांच्या काळातील सर्वात जुन्या इमारतीमध्ये या चाळीचा समावेश होतो. 'बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट' (बीडीडी) ची स्थापना १९२० मध्ये झाली होती. इंग्रजांच्या काळात वरळी, नैगाव, एनएम जोशी मार्ग आणि सिउरीमध्ये बीडीडी चाळी उभारण्यात आल्या होत्या. या चाळींचे बांधकाम १९२१ ते १९२५ दरम्यान झाले होते. हे सर्व गृह प्रकल्प ९० वर्षांपेक्षा जास्त जुने झाल्याने महाराष्ट्र सरकारने या चाळींचे पुन्हा बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. नैगाव तसेच एनएम जोशी मार्गावरील चाळीच्या पुनर्विकासाचे काम आधीच सुरू झाले आहे. 


अाता अशी 
- 22 हेक्टर जमिनीवरील प्रकल्प तयार केला होता बीडीडीने 
- 121 इमारती आहेत, प्रत्येक इमारतीमध्ये ८० खोल्या 
- 1921 ते १९२५ दरम्यान झाले होते या चाळीचे बांधकाम 
- 9700 कुटुंबीय राहतात सध्या या वरळीतील चाळीमध्ये 


बांधकामानंतर अशी दिसेल 
- 2.2 कोटी चौ. फूट परिसरात पुनर्विकासाचे काम करणार म्हाडा 
- 8 वर्षांमध्ये एकूण पाच टप्प्यांत होणार काम पूर्ण. 
- 10 हजार रोजगार निर्मिती होईल इमारतीच्या पुनर्विकासात 
- 98 इमारती उभारणार या जागेवर, २२ पासून ६६ मजल्यांपर्यंत असतील 

बातम्या आणखी आहेत...