आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त शिक्षकांना रुजू करण्यास नकार, संस्थांचे अनुदान थांबवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजनांतर्गत रुजू करून घेण्यास नकार देणाऱ्या शिक्षण संस्था, शाळांचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे वेतनेतर अनुदान थांबवण्यात यावे, असे आदेश शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी विभागीय शिक्षण संचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.


राज्यात २०१७-१८ च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांतील ३ हजार ३३१ शिक्षक अतिरिक्त ठरलेले होते. त्यापैकी १ हजार ४६५ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन झाले अाहे. त्यापैकी ८४६ शिक्षक समायोजन झालेल्या नव्या शिक्षण संस्थांमध्ये, शाळांमध्ये रुजू झाले आहेत. मात्र, उर्वरित ४१९ शिक्षक समायोजनात नव्या शिक्षण संस्थांवर नेमणूक होऊनही प्रत्यक्षात रुजू झालेले नाहीत. कारण त्यांना त्या शिक्षण संस्थांनी, शाळांनी रुजू करून घेण्यास नकार दिलेला आहे.    ज्या शाळांनी (शिक्षण संस्थांनी) समायोजनानुसार अतिरिक्त शिक्षकास हजर करून घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली आहे, अशा शाळांतील सदर पद व्यपगत (संपुष्टात) करण्यात येईल, अशी तंबीदेखील देण्यात आली आहे. दरम्यान, वितरित केल्यास जबाबदार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही  शिक्षणाधिकारी व सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...