आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखा, अमृता सुभाष यांना ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रथम ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना जाहीर झाला आहे. विलेपार्लेचे आमदार अॅड. पराग अळवणी, आर्च एंटरटेनमेंटचे विनीत आणि अर्चना गोरे, प्रसाद महाडकर आणि स्मिता पाटील यांची जवळची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी हा पुरस्कार यंदापासून सुरू केला आहे. १३ डिसेंबर २०१७ रोजी स्मिता पाटील यांची ३१वी पुण्यतिथी होती. पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. या वेळी स्मिता पाटील यांची स्मृती जागवणारा मूर्तिमंत ‘अस्मिता’ हा कार्यक्रमही सादर केला जाईल. या कार्यक्रमाचे निवेदन तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर करणार असून सरिता राजेश, अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटील यांच्या चित्रपटांतील गाणी सादर करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...