आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स इंडस्ट्रीजची या वर्षामध्ये 40,000 कोटी उभारण्याची योजना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीज या वर्षी कंझ्युमर बिझनेस वाढवण्यासाठी ४०,००० कोटी रुपये जमवण्याची योजना तयार करत आहे. यामधील २०,००० कोटी रुपये नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सच्या माध्यमातून जमवण्यासाठी कंपनीने आधीच शेअरधारकांची परवानगी घेतलेली आहे. कंपनी ऑगस्टमध्ये फायबर आधारित ब्रॉडबँड सेवा सुरू करणार आहे. याव्यतिरिक्त अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून काही मालमत्तेचीही खरेदी करण्यात येणार आहे.

 

रिलायन्स कम्युनिकेशनचे स्पेक्ट्रम, टॉवर आणि फायबरसाठी कंपनी १७,३०० कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. अालोक इंडस्ट्रीजच्या लिलावामध्ये कंपनीने ५,००० कोटी रुपये मिळवले आहेत. याव्यतिरिक्त काही अपॅरल ब्रँड आणि नवीन रिटेल आऊटलेट सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिग्रहणाव्यतिरिक्त कंपनीच्या जुन्या कर्जाची रिफायनन्सिंग आणि कमी कालावधीच्या कर्जाला दीर्घ मुदतीच्या कर्जात रूपांतरित करण्यासाठीही पैशाची आवश्यकता आहे.

 

मागील पाच वर्षांत रिलायन्सवरील कर्ज तीनपटीने वाढले आहे. दूरसंचार आणि पेट्रोकेमिकल्स बिझनेससाठी कंपनीने ३.३ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. सध्या कंपनीवर २.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त कर्ज २०२२ पर्यंत परत करायचे आहे. कंपनीकडे ७८ हजार कोटी रुपयांचे नगदी भांडवल आहे. मजबूत आर्थिक स्थिती आणि चांगली मानांकन असल्यामुळे ही कंपनी देशातील डेट बाजारापेक्षाही स्वस्त कर्ज मिळवू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

 

सरकारपेक्षा चांगले मानांकन, त्यामुळे स्वस्त कर्ज
एसअँडपी ग्लोबल रेटिंगने रिलायन्सला बीबीबी-प्लस मानांकन दिले आहे. भारत सरकारच्या मानांकनापेक्षही हे मानांकन दोन श्रेणीने वरती आहे. साॅव्हरेनपेक्षाही चांगले मानांकन असल्यामुळे कंपनी कमी व्याजदरावर विदेशी बाजारातून कर्ज मिळवू शकते. सुमारे सात वर्षांनंतर ऑगस्ट-नाेव्हेंबर २०१७ दरम्यान कंपनीने भारतात बाँड मार्केटमधून २०,००० कोटी जमवले होते. यावर कंपनीला ६.७८ टक्के ते ७.०७ टक्के व्याज द्यायचे होते, तर तीन वर्षांच्या कॉर्पोरेट ब्रँडचा सरासरी यील्ड ७.१५ टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...