आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंजीर: या श्‍वानाने 1993 Mumbai Bomb Blasts मध्‍ये वाचवले होते हजारोंचे प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मार्च 1993मध्‍ये मुंबईत झालेल्‍या 12 भीषण बॉम्‍बस्‍फोटांमध्‍ये 257 जणांना जीव गमवावा लागला होता व 713 जण जखमी झाले होते. मात्र तुम्‍हाला माहिती आहे, एक श्‍वान नसता तर ही संख्‍या हजारोंच्‍या घरात गेली असती. मुंबईच्‍या बॉम्‍ब शोधक पथकासोबत या श्‍वानाने तेव्‍हा काम केले होते. या श्‍वानाचे नाव आहे जंजीर. याबाबतची माहिती आज मुंबई पोलिसांनी आपल्‍या ट्विटरवरून दिली आहे.

 

मुंबई बॉम्‍ब पथकासोबत काम करताना या श्‍वानाने त्‍यादरम्‍यान तब्‍बल 3329 किलोंचे RDX, 600 डिटोनेटर्स, 249 हँड ग्रेनेड्स आणि 6000 हून अधिक गोळाबारूद शोधून काढले होते. तसेच ब्‍लास्‍टच्‍या दुस-या दिवशी तीन जिवंत बॉम्‍बचा शोध या श्‍वानाने लावला होता. त्‍यामुळे हजारोंचे प्राण वाचवण्‍यात मुंबई पोलिसांना यश आले होते. मुंबई ब्‍लासदरम्‍यान तीन श्‍वान मुंबई पोलिसांच्‍या दिमतीला होते. त्‍यापैकी जंजीर सर्वोत्‍कृष्‍ट होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.


1973मधील बॉलिवूड सिनेमा 'जंजीर'च्‍या नावावरून या श्‍वानाचे नाव ठेवण्‍यात आले होते. पुण्‍यामध्‍ये जंजीरचे प्रशिक्षण झाले होते. गुन्‍ह्यांचा तपास लावण्‍यासाठी पोलिस पथकांमध्‍ये आता प्रशिक्षित श्‍वानांचा समावेश केला जातो. यामुळे पोलिसांना फायदा होतोच मात्र त्‍यामुळे हजारोंचे प्राणदेखील वाचवता येतात हे जंजीरने सिद्ध करून दाखवले. आपल्‍या सेवेते जंजीरने 175 पेट्रोल बॉम्‍ब्‍स, 57 देशी बॉम्‍ब, 11 लष्‍करी बॉम्‍ब, 600 डिटोनेटर्स आणि 200हून अधिक ग्रेनेड्सचा शोध लावला आहे.


नोव्‍हेंबर, 2000 साली हाडांचा कँसर झाल्‍याने वयाच्‍या 8व्‍या जंजीरचा मृत्‍यू झाला. आपल्‍या उत्‍कृष्‍ट सेवेमुळे शासकीय इतमामात जंजीरचे अंतिमसंस्‍कार करण्‍यात आले होते. यानिमित्‍तने प्राणी हे माणसाचे फक्‍त मित्र तसेच सोबतीच नसतात तर संकटाकाळी आपले प्राण बचावण्‍यातही महत्‍त्‍वाची भुमिका बजावतात, हेच अधोरेखित झाले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...