आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता RJ मलिष्‍का म्‍हणतेय, \'गेली आमची मुंबई खड्ड्यात..\'; तुम्‍ही पाहिलंत का तिचे नवे साॅंग?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'मुंबई तुला BMC वर भरोसा नाय का?', असे म्‍हणत गेल्‍या वर्षी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालणारी RJ मलिष्‍का पुन्‍हा एक नवे गाणे घेऊन आली आहे. सैराटमधील 'झिंगाट' गाण्‍याच्‍या चालीवर हे नवे गाणे तिने व तिच्‍या टीमने तयार केले आहे. यामध्‍येही मागील वर्षीप्रमाणेच यंदाही खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेची तिने चांगलीच खिल्‍ली उडवल्‍याचे दिसत आहे. 'गेली आमची मुंबई खड्ड्यात', असे या गाण्‍याचे बोल आहे. सध्‍या तरी या गाण्‍याचे टीझर तिने रिलीज केले आहे. संपुर्ण गाणे आज मंगळवारी संध्‍याकाळी 5 वाजता रिलीज करू असे तिने सांगितले आहे. 

 

मागील वर्षी मलिष्‍काचे गाणे व्‍हायरल होताच शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते महापालिकेच्‍या बचावासाठी सरसावले होते. नंतर मलिष्‍काच्‍या घराची तपासणी करत घरात डास आढळले म्‍हणून मलिष्‍काला दंड आणि नोटीसही महापालिकेने बजावली होती. सुडबुद्धीने ही कारवाई झाल्‍याचे आरोप नंतर BMCवर करण्‍यात आले होते. आता नवीन गाण्‍यावरून महापालिका तसेच शिवसैनिक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्‍त्‍वाचे ठरणार आहे. मात्र आपण सर्व प्रतिक्रियांसाठी तयार आहोत, असे आरजे मलिष्‍काने म्‍हटले आहे.    

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, मलिष्‍काच्‍या नविन गाण्‍याची झलक...  

 

बातम्या आणखी आहेत...