आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईतील पवई येथील आयआयटीच्या कॅन्टीनमध्ये एक तुघलकी फतवा काढण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता कॅन्टीनमध्ये मांसाहार करायचा असेल तर त्यासाठी वेगळे ताट घ्यावे, शाकाहारी विद्यार्थी जेवणासाठी जी ताटे वापरतात ती मांसाहारासाठी वापरता येणार नाहीत असा फतवाच तेथे काढण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविला असून, प्रशासनाने टोलवाटोलवी सुरू केली आहे.
पवईतील आयआयटी पवईमध्ये अनेक हॉस्टेल आहेत. मात्र, 12 जानेवारी रोजी आयआयटी प्रशासनाने हॉस्टेल क्रमांक-11 येथे राहणा-या सर्व विद्यार्थ्यांना मेल करून वरील सूचना दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, कॅन्टीनमध्ये ठेवण्यात आलेली ताटे मांसाहारासाठी वापरू नयेत. त्यासाठी वेगळी ताटे वापरावीत. मात्र, हा मेल येताच विद्यार्थ्यांनी या मेलचा स्क्रीनशॉट घेऊन तो सोशल मिडियात व्हायरल केला. यानंतर प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
आयआयटी प्रशासनाचे म्हणणे आहे की, काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी मांसाहार करण्यासाठी स्वतंत्र ताटे ठेवावीत अशी विनंती केली होती. येथे काही जैनधर्मिय विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी वर्ज्य आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनांची दखल घेऊन कॅन्टीनमध्ये ट्रे- आकाराची असलेली ताटे मांसाहारासाठी वापरावीत अशी सूचना करण्यात आली आहे.
आयआयटी पवईत कॅन्टीन व हॉस्टेलची कशी आहे व्यवस्था-
- आयआयटी पवईत अनेक हॉस्टेल आहेत. तेथील प्रत्येक हॉस्टेलला क्रमांक देण्यात आले आहेत.
- आयआयटीतील सर्व कॅन्टीनमध्ये शाकाहारी व मांसाहारी पदार्थ मिळतात.
- मांसाहार करणा-या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फूड काऊंटर्स केली आहेत.
- आयआयटी पवईत जैन पदार्थही मिळतात, ज्यात कांदा, लसून याचा वापर केला जात नाही.
- तेथे उपवासाचे देखील पदार्थ मिळतात. शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबलव्यवस्था आहे.
- जर तुम्हाला तेथील पदार्थ, सेवासुविधा याची तक्रार करायची असेल तर मेस काऊंसिलचे रजिस्टरही आहे. त्यात तुम्ही तुमच्या तक्रारी करू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.