आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावती Train पकडण्‍याच्‍या नादात प्‍लॅटफॉर्म गॅपमध्‍ये पडला युवक, RPF कॉन्‍स्‍टेबलने वाचवला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शनिवारी संध्‍याकाळी पनवेल रेल्‍वे स्‍टेशनवर धावती ट्रेन पकडण्‍याच्‍या नादात एक युवक प्‍लॅटफॉर्म गॅपमध्‍ये पडता पडता वाचला. एका आरपीएफ कॉन्‍स्‍टेबलने प्रसांगावधान दाखवत वेळीच या युवकाला खेचल्‍यामुळे त्‍याचा जीव वाचला. ही सव्र घटना स्‍टेशनवरील सीसीटीव्‍ही कॅमे-यात कैद झाली आहे. 


अशी घडली दुर्घटना  
पनवेल स्‍टेशनवर 25 वर्षीय बाळू नामक युवक पनवेल-नांदेड एक्‍सप्रेस पकडण्‍याचा प्रयत्‍न करत होता. मात्र ट्रेन पकडत असतानाच तो खाली पडला. यावेळी ड्युटीवर तैनात आरपीएफ जवान विनोद शिंदे यांनी वेळीच धाव घेत युवकाला खेचले. यामुळे प्‍लॅटफॉर्म गॅपमध्‍ये जाण्‍यापासून हा युवक बालंबाल बचावला. दुर्घटनेवळेस ट्रेन जवळपास 30 किमी/तास या वेगाने धावत होती. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ...   

 

बातम्या आणखी आहेत...