आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाचे संघटनमंत्री तपासणार खासदारांचे प्रगतिपुस्तक; मोदी, शहांना देणार अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी रा. स्व. संघाच्या संघटनमंत्र्यांवर भाजप खासदारांचे प्रगतिपुस्तक तपासण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघटनमंत्री मतदारसंघात खासदाराच्या कामांचा अभ्यास करतील व महिन्याच्या आत अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांना सादर करतील. 

 

संघाच्या पदाधिकाऱ्याला प्रत्येक राज्यात भाजपचा संघटनमंत्री म्हणून नेमण्यात आलेले आहे.
भाजप आणि संघाच्या नेत्यांची एक बैठक नुकतीच सूरजकुंड येथे पार पडली. पंतप्रधान मोदी यांनीच ही बैठक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती. या बैठकीत भाजपच्या सर्व संघटनमंत्र्यांवर खासदारांचे प्रगतिपुस्तक तपासण्याची जबाबदारी दिली आहे.

 

शिवसेनेचेही सर्वेक्षण

२३ जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेनेही ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्याचे सांगितले जाते. या सर्वेक्षणात लोकसभा व विधानसभा मतदारसंघांत कोणाला तिकीट दिले जाऊ शकते याचा अंदाज घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...