आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BAR मध्ये हुक्का ओढत होते लोक; नितेश राणेंच्या स्वाभिमानने केली अशी तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री वर्सोवा येथील सिरोको कॅफे आणि इन्स बाय नावाच्या हुक्का पार्लरमध्ये शिरत तोडफोड केली. खुलेआम हुक्का पिण्यास या कार्यकर्त्यांचा विरोध होता.

 

 

कार्यकर्त्यांचा नेमका विरोध कशामुळे?
- मुंबईत वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे कार्यकर्त्यांनी राज्यात कुठेही हुक्का बार चालु देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांनी यावेळी हुक्का आणि नशा करणाऱ्यांविरोधात घोषणाबाजीही केली.
- स्वाभिमान संघटनेचे प्रशांत सुदला यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 
- कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर स्वाभिमान आक्रमक झाली असून निष्पाप लोकांचे बळी जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 
- या घटनेनंतर बारचे मालक कौशल शाह यांनी फिर्याद दिली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...