आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारापासून IAS अधिका-याच्या मुलीपर्यंत, जेव्हा सनकी लोकांनी सेलिब्रेटिजना केले त्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा तेंडुलकरच्या आधी गेल्या वर्षी हरियाणा केडर आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका स्टॉकिंगची शिकार ठरली होती. - Divya Marathi
सारा तेंडुलकरच्या आधी गेल्या वर्षी हरियाणा केडर आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका स्टॉकिंगची शिकार ठरली होती.

मुंबई- राज्यसभेचा खासदार आणि माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी साराला बंगालमधील मनो विकृत तरूणाने त्रस्त केले आहे. कॉलेजमधील ड्रॉपआउट झालेल्या या सनकीने केवळ साराला कॉलच केले नाही तर किडनॅपिंग करण्याची धमकी सुद्धा देऊन टाकली होती. पण ही काही पहिलीच घटना जेव्हा सेलेब्स किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्स स्टॉकर्सकडून त्रस्त झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही केसेसबाबत सांगणार आहोत.

 

IAS ची मुलगी ठरली होती शिकार-

 

- गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चंडीगड निवासी हरियाणा केडरचे IAS वीरेंद्र कुंडू यांची मुलगी रस्त्यावरून कारने जात असताना तिचा अर्धा तास पाठलाग केला होता. ही हाय प्रोफाईल केस खूपच चर्चित राहिली. 
- 4 ऑगस्ट 2017 च्या रात्री 29 वर्षाची वर्णिका कुंडू आपल्या कारमधून घरी परतत होती. तेव्हा काही तरूणांनी तिचा पाठलाग केला. तसेच वारंवार तिचा रास्ता अडविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर तिच्या गाडीला ठोस मारण्याचाही प्रयत्न केला. 
- एवढेच नाही तर वर्णिकाने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, त्या तरूणांनी तिच्या कारचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
- 7 किमीपर्यंत तिचा पाठलाग करताना एका पीसीआर वॅनमुळ वर्णिका वाचली होती.

 

काय झाले सचिनच्या मुलीसोबत-

 

- सचिन तेंडुलकर की बेटी सारा को फोन पर परेशान करने के आरोप में पुलिस ने एक आर्टिस्ट को पश्चिम बंगाल से गिरफ्तार किया

- मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, देव कुमार मैती पूर्व मिदनापूरचा राहणारा आहे. तो एक कलाकार आहे. काही महिन्यांपूर्वी तो एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मुंबईत पोहचला होता. याचदरम्यान त्याला सारा तेंडुलकरचा मोबाईल नंबर मिळाला होता. 
- यानंतर आरोपी साराच्या नंबरवर वारंवार फोन करून तिला त्रस्त करू लागला. देव कुमारने अनेकदा साराच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आरोपीचे म्हणणे आहे की, तो तिच्यावर प्रेम करतो.

 

आपणही जर कोणामुळे त्रस्त असाल तर अशी करा तक्रार- 

 

- नॅशनल कमीशन फॉर वुमनने स्टॉकर्सपासून सुटका करून घेण्यासाठी ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 
- या वेबसाईटद्वारे पीडीत व्यक्ती देशातील कोणत्याही काना-कोप-यातून ऑनलाईन तक्रार करता येते. 
- तक्रार दाखल केल्यानंतर NCW संबंधित क्षेत्रातील पोलिस ठाण्याला तपास करण्याचे आदेश देते.
- सीरियस केसच्या बाबतीत NCW ची एक चौकशी समिती तयार केली जाते. जी नंतरही त्याचा तपास, चौकशी करते. 
- NCW जवळ आरोपी, साक्षीदार आणि पोलिस रिकॉर्ड्सला आपल्या ऑफिस बोलवून चौकशी करण्याचे अधिकार आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...