आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन, 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एकपात्री श्रेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्तव जेष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे डोंबिवली येथे दुःखद निधन झाले. आपल्या एकपात्री कार्यक्रमातून त्यांनी दीर्घकाळ रसिकांना हसवत ठेवले. पुण्यातील राहत्या घरी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणण्यात आले आहे.  त्यानंतर सकाळी 9 वाजता नाट्य परिषदेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. 


'आम्ही दिवटे' हे त्यांचेआत्मकथन प्रसिद्ध आहे. 'हसरी उठाठेव' या विनोदी नाट्यातून त्यांनी रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते डोंबिवलीमध्ये मुलाच्या घरी राहत होते. यावेळी ते घरात पडले. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील आल्याचे समजते. ते 68 वर्षांचे होते.

बातम्या आणखी आहेत...