आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते दिलीप कुमारांचे घर बिल्डरने बळकावले, पत्नी सायरा बानोंची CM फडणवीसांकडे धाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायरा बानो - Divya Marathi
सायरा बानो

मुंबई- ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून मदतीची याचना केली आहे. सायरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात समीर भोजवानी नावाच्या बिल्डरवर आपले पती अभिनेता दिलीप कुमार यांचे बांद्रा (पश्चिम), पाली हिलमधील घर बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. सीएम यांना लिहलेल्या पत्रात काय लिहले सायरा यांनी?...

 

- सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात आरोप केला की, भोजवानी त्यांना वारंवार धमकी देत आहे. याशिवाय पाली हिल येथील घर जबरदस्तीने बळकिण्यासाठी बिल्डरने खोटी कागदपत्रे तयार केली आहेत.
- ट्रॅजेडी किंगच्या पत्नीचे म्हणणे आहे की, बिल्डर भोजवानी आपले राजकीय आणि प्रशासकीय अधिका-यांशी असलेल्या संबंधांचा फायदा घेत आमच्यावर दबाव टाकत आहे.

दिलीप कुमार यांनी 1 लाख 40 हजारात खरेदी केले होते घर

- सायरा बानो यांनी सांगितले की, अभिनेता दिलीप कुमार यांनी1953 मध्ये हसन लतीफकडून पाली येथील घराची जागा 1 लाख 40 हजारांना खरेदी केली होती. परिजात डेव्हलपर्ससोबत 2008 मध्ये या जागेचा पुनर्विकास करण्याचा करार झाला होता. मात्र, काही कारणामुळे हे प्रकरण कोर्टात गेले. 
- खूप दिवस चाललेल्या खटल्यानंतर 30 ऑगस्ट 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने संबंधित जागा डेव्हलपर्सला अभिनेता दिलीप कुमार यांना ती जागा परत देण्याचे आदेश दिले.
- यानंतर सायरा बानो यांनी 12 सप्टेंबर 2017 रोजी संबंधित जागेवर ताबा घेतला.
- मात्र, आता ब्रांदा येथील पाली हिल स्थित या घराच्या जमिनीचे खोटी कागदपत्रे बनवून समीर भोजवानी नावाचा बिल्डर त्यांना बेघर करू इच्छित आहे. 
- ज्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...