आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खानला हिट अॅंड रन प्रकरणी दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाने जामीनपात्र वॉरन्ट केले रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला 2002 च्या हिट अॅंड रन प्रकरणात जामीनपात्र वाॅरन्ट रद्द केला आहे. यामुळे सलमानला दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात पुराव्यांच्या अभावी हायकोर्टाने सलमानला निर्दोषही सोडलं होते. पण त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हायकोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.  

 

सलामानने दारू पिऊन गाडी चालवत असताना एका व्यक्तीला गाडीने उडवले होतं. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता व चार जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडले होते. पोलिसांनी आणि जखमींनी ही अपघात झाला तेव्हा सलमान खान गाडी चालवत होता असे सांगितले असतानाही त्याला सोडण्यात आले होते. अशी माहिती महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली होती. सलमानला नुकताच काळवीट प्रकरणात जामीन मिळाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...