आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकांप्रमाणेच मलाही जामीन द्या, समीर भुजबळांची उच्‍च न्‍यायालयात मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनी लाँडरिंग प्रकरणात मुख्य आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना नुकताच जामीन देण्यात आला असून आपण या प्रकरणी सहआरोपी आहोत. त्यामुळे छगन भुजबळ यांच्याप्रमाणे आपल्यालाही जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी केली आहे.

 

यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. छगन व समीर भुजबळ यांच्यावर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यासह विविध ५१ गुन्हे सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेले आहेत. त्यानुसार २०१६ मध्ये दोघांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, छगन भुजबळांना ४ मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, समीर यांनीही अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. छगन भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर समीर यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे वकील विक्रम चौधरी यांच्यानुसार, या प्रकरणाची चौकशी झाली आहे. मुख्य आरोपी छगन भुजबळ यांनाही जामीन मिळाला आहे.

 

याशिवाय, या प्रकरणी ५१ जणांनाही जामीन मिळालेला आहे. एकमेव समीर हेच तुरुंगात आहेत. वास्तविक, या गुन्ह्याखाली कमाल ७ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाऊ शकतो आणि समीर यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ कैदेत काढला आहे. त्यामुळे त्यांना जामीन दिला जावा, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.  


१७ मे रोजी न्यायालय देणार निर्णय : न्या. व्ही. एल. अचिल्य यांच्या पीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने १७ मे रोजी पुढील सुनावणी ठेवली. पीठातील अन्य न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी सांगितले की, छगन भुजबळांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच ते चौकशीत सहकार्य करत असल्याने जामीन देण्यात आला.

 

पुढील स्‍लाइडवर, छगन भुजबळ सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन लीलावतीत...

 

बातम्या आणखी आहेत...