आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीच नाही तिची हत्या कशी होईल? कर्नाटकातील नाट्यावरुन संजय राऊतांचा टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी काॅंग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाचा यात भाजपने ने आघाडी घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आणि गुरुवारी सकाळी पक्षाचे विधिमंडळ नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे काॅंग्रेसने निदर्शने केली आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी 'देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या कशी होईल?' अशी टीका राऊत यांनी केली आहे. 


संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले, येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करणे कठीण असणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना राज्यपालांनी सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल. याआधीही खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकातील राजकीय नाट्यावर टीका केली होती. कर्नाटकचे राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 

 

बातम्या आणखी आहेत...