आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- काही महिन्यांपासून घडणाऱ्या विविध घटनांमुळे राज्यघटना धाेक्यात अाली अाहे, असा अाराेप विराेधकांकडून केला जात अाहे. मात्र काहीही झाले तरी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या राज्यघटनेप्रमाणेच देश चालेल असा संदेश देण्यासाठी २६ जानेवारी राेजी मुंबईतील गेटवे अाॅफ इंडिया परिसरात ‘संविधान बचाव, देश बचाव’ असा नारा देत रॅली काढण्यात येईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी, नॅशनल काॅन्फरन्सचे डाॅ. फारूक अब्दुल्ला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर, दलित नेते अामदार जिग्नेश मेवाणी या रॅलीत सहभागी होतील, अशी माहिती अामदार जितेंद्र अाव्हाड यांनी दिली. मुंबईप्रमाणेच देशातील अन्य १५ शहरांतही अशी पदयात्रा काढण्यात येणार अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.