आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भापकर मंत्रालयात सचिव, केंद्रेकर विभागीय आयुक्त;12 अायएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची कृषी आणि कृषी विकास विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली असून राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांची औरंगाबादच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. भापकर २८ फेब्रुवारीला निवृत्त हाेत अाहेत. राज्य सरकारने शनिवारी १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. कर्जमाफी ऑनलाइन घोळानंतर आयटी विभागातून गच्छंती झालेल्या विजय गौतम यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून वित्त विभागाच्या प्रधान सचिवपदावरून त्यांना पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


श्रीमती निमा अरोरा यांची बदली जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. भंडारा येथील सह- जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांची बदली परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. नाशिक येथील प्रकल्प अधिकारी आणि सह-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली बीड येथे करण्यात आली आहे. अमरावती येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली येथील सह जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी सचिन ओंबासे यांची बदली अहेरी येथून गडचिरोली येथे त्याच पदावर करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. कुलकर्णी यांची बदली आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे बदली करण्यात आली आहे. एम. जी. गुरसल यांची बदली शुल्क विनियामक प्राधिकरणात करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य व्यवस्थापकीय संचालक अजय गुल्हाणे यांची बदली वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...