आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे असेल नवे मनोरा आमदार निवास, पंचतारांकित हॉटेल्सला भारी असेल ही वास्तू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे असेल नवे मनोरा आमदार निवास .... - Divya Marathi
असे असेल नवे मनोरा आमदार निवास ....

मुंबई- राज्यातील आमदारांसाठी मुबंईत नवे मनोरा आमदार निवास बांधण्यात येणार आहे. हे नवे आमदार निवास कसे असेल याची आराखडा व प्रतिकृती समोर आली आहे. हे आमदार निवास अत्याधुनिक व पंचतारांकित सेवा-सुविधा असणार असल्याचे समोर येत आहे. 

 

जेमतेम 25 वर्षांपूर्वी बांधलेले ‘मनोरा’ आमदार निवास जमीनदोस्त करून नवे भव्य आमदार निवास सरकार बांधणार आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सध्याची ही भलीमोठी इमारत पडण्याची वेळ सरकारवर आली आहे. बांधकाम विभागाचा गैरव्यवहार दडपण्यासाठी ‘मनोरा’चे पुनर्निर्माण केले जात असल्याचे आरोप यापूर्वीच झाले आहेत. 

 

धोकादायक झालेले मुंबईतील मनोरा आमदार निवास काही महिन्यांपूर्वी रिकामे करण्यात आले होते. आमदारांना राहण्यासाठी पर्यायी सोय चेंबूर येथील रायजिंग सिटी संकुलात करण्यात आली आहे. मनोरा आमदार निवासामधील चारही विंग पाडल्या जाणार आहेत. तर मनोराच्या जागी नवीन आमदार निवास बांधण्याबाबत आराखडा अंतिम करण्यात आला आहे. 

 

आमदारांसाठी मुंबईत निवासाकरता नरिमन पॉईंट इथल्या मोकळ्या जागेत टोलेजंग मनोरा आमदार निवास बांधण्यात आले होते. यामध्ये 158 आमदारांचे निवासस्थान आहे. प्रत्येक आमदाराला सुमारे 300 चौरस फूटपेक्षा मोठ्या दोन सदनिका देण्यात आल्या आहेत. मात्र अवघ्या 25 वर्षात या मनोरा आमदार निवासामध्ये अनेक समस्या पुढे यायला सुरुवात झाली. यात प्लास्टर निघणे, स्वच्छतागृहातमध्ये पाणी गळती पासून अनेक समस्या पुढे आल्या. त्यातच इमारतीच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'मध्येही इमारत दुरुस्त करणे अवघड असल्याचे समोर आले. या मनोरा आमदार निवासाचा मुद्दा अनेक अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे मनोरा आमदार निवास नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, कोणत्या कोणत्या असतील सेवा-सुविधा....

बातम्या आणखी आहेत...