आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स @36,548 : आजवरचा विक्रम, रिलायन्सचे शेअर्स वधारले, क्रूडची स्वस्ताई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- सेन्सेक्सच्या 30 पैकी १७ शेअर बढतीसह बंद झाले. १३ शेअर्स घसरले. वधारणाऱ्या शेअर्समध्ये ८ बँकिंग व फायनान्सचे आहेत.

- बीएसईत ५५ शेअर्सने ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र १५० शेअर्स २५ आठवड्यांच्या नीचांकांवरही आले.


मुंबई- शेअर बाजाराने गुरुवारी विक्रम रचला. सेन्सेक्स २८२ अंकांनी वधारून ३६,५४८ वर बंद झाला. ३६,२८३चा मागील विक्रम २९ जानेवारी २०१८चा आहे. निफ्टी ११,०२३ अंकांवर बंद झाला. ही पातळी ३१ जानेवारीच्या ११,०२७ नंतर सर्वाेच्च आहे.


रिलायन्सचे शेअर्स वधारले
सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे वेटेज ९.१३ टक्के आहे. आयटीसी व इन्फोसिसनंतर हे सर्वाधिक आहे. त्यात ४.४% तेजीने इंडेक्सला फायदा झाला. सर्वात मोठी कंपनी टीसीएसचे वेटेज ६.८५% आहे.


चांगल्या निकालाची आशा
जीएसटीआधी गतवर्षी जून तिमाहीत उत्पादन व मागणी घटली होती. परिस्थितीत सुधारणा आणि कमकुवत बेसमुळे यंदा एप्रिल-जूनचे निकाल चांगले राहण्याची आशा आहे.


क्रूडची स्वस्ताई
लिबिया देशाकडून पुरवठा सुरू झाल्याच्या वृत्ताने क्रूड ७% घसरून ७३.४ डॉलर प्रतिबॅरल झाले. इराणकडून तेल खरेदी करणाऱ्यांबाबत अमेरिकेने नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.   

सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर असूनही...
- बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप उच्चांकी पातळीपेक्षा ७.९२ लाख कोटींनी कमी आहे. २३ जानेवारीला ते विक्रमी १५६.५६ लाख कोटींवर होते. गुरुवारी ते १४८.६३ लाख कोटी रुपये होती. 
- कारण की, सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त पाचच शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत. उर्वरित २५ शेअर्स उच्चांकी पातळीपेक्षा कमीच आहेत.

बातम्या आणखी आहेत...