आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोल्हापूर- राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री धोरणात्मक निर्णय घेत असतो मात्र, आता हे निर्णय कोल्हापूरच्या उपकेंद्रातून होतात, असे तिरकस भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर केली. कधी नव्हे ती संधी मिळाली की माणूस हापापतो असे सांगत चंद्रकातदादांच्या कार्यशैलीही भाष्य केले. तसेच त्यांनी एकदा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवावीच असे आव्हानही पवारांनी पाटलांना दिले.
शरद पवार सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर कोल्हापूरकडे कूच केली. दोन दिवसाच्या दौ-यासाठी रविवारी सायंकाळीच तो कोल्हापूरात दाखल झाले. यानंतर पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन चौफेर फटकेबाजी केली. या पत्रकार परिषदेत पवारांनी चंद्रकांतदादा पाटलांना लक्ष्य केले.
चंद्रकांतदादा हे विधानसभेतील आमदार नाहीत. गेली तीन टर्म ते पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले आहेत. मात्र, 2014 साली केंद्रात मोदी सरकार आले आणि चंद्रकांत पाटलांचे भाग्य उजळले. मोदी सत्तेत येताच त्यांनी आपले विश्वासू अमित शहा यांना पक्षाध्यक्ष केले. अमित शहा व चंद्रकांतदादा यांची दोस्ती 80 च्या दशकापासून आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भाजयुमोपासून दोघांची साथ आहे. चंद्रकांत दादा ज्यावेळी राज्याचे भाजयुमोचे प्रमुख होते त्याच वेळी अमित शहा गुजरातचे प्रमुख होते. अमित शहांचा जन्म मुंबईत झाला तर त्यांची सासरवाडी चंद्रकांतदादांचे गाव कोल्हापूरातील आहे. त्यामुळे या दोन नेत्यांत एक जवळिक होती. त्यामुळे अमित शहा पक्षाध्यक्ष होताच चंद्रकांतदादांचे भाजपमध्ये भलतेच वजन वाढले.
आता तर ते मुख्यमंत्र्यांपाठोपाठ दुस-या क्रमांकांचे नेते आहेत. अमित शहांची खंबीर साथ असल्याने चंद्रकांतदादा कधी कधी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांची माहिती, घोषणा करतात. अर्थातच अमित शहांचे निकटवर्तीय भाजपमधील मंडळी व खुद्द फडणवीसही शांत बसतात. मंत्रिमंडळ विस्तार कधी व कसा करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतानाही चंद्रकांतदादा अमित शहांच्या हवाल्याने घोषणा करून टाकतात. हे असे अनेकदा घडले आहे. त्यामुळे पवारांनी चंद्रकांतदादांच्या या बालिश वागण्यावर तिरकस भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व खुद्द पवारांबाबतही चंद्रकांतदादा कधी कधी टीका-टिप्पणी करतात त्यामुळे कोल्हापूरात जाताच पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच चंद्रकांतदादांना लोकांची नाडी माहिती नाही. मंत्री म्हणून काम करताना कधी नव्हे ती संधी मिळाली की हापापल्यासारखे असे होतेच असे सांगत त्यांना लोकांतून म्हणजे विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले. चंद्रकांतदादा पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
पवार आणखी काय काय म्हणाले-
- साखर उद्योग अडचणीत आहे. त्यावर 60 टक्के सेस लावा व ही रक्कम शेतक-यांना द्या.
- पुढच्या वर्षी साखरेचे प्रचंड व विक्रमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे निर्यातपूरक धोरण आखावे यासाठी मोदींची आज भेट घेणार.
- शेतक-यांशी संबंधित पीक उत्पादनापासून इथेनॉल तयार होते त्याचे दर वाढविण्यासाठी हे सरकार पेट्रोलचे दर वाढवते असे सांगत टीकास्त्र.
- आम्ही भाजपविरोधात लढणार. संसदीय लोकशाही वाचविण्यासाठी व देशहितासाठी काँग्रेस-राष्ट्रवाजी एकत्र.
- देशहित लक्षात घेऊनच भाजपविरोधात मोट बांधणार, त्याचाच भाग म्हणून राहुल गांधींनी भेट घेऊन माझ्याशी चर्चा केली.
- न्यायपालिका चौकटीत काम करत नाही. निर्णयप्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने महाभियोगसारख्या घटना
- मी 10 मे रोजी नाणारला जाणार, तेथील ग्रामस्थांची मते लक्षात घेऊन व राज्याचे हित कशात आहे हे पाहून निर्णय घेणार.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.