आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोपी न घालणारे आता इफ्तारची दावत देऊन \'टोप्या\' घालताहेत- पवारांची संघ- भाजपवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्या लोकांनी कधी मुस्लिमांची टोपी घातली नाही, ते लोक आता इफ्तारची दावत देत आहेत. मात्र, त्यांचे मन स्वच्छ नाही. आता काही प्रतिगामी लोक इफ्तार दावतचे आयोजन करून मुस्लिमांना टोप्या घालताहेत अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघ परिवार व भाजपवर केली आहे. 

 

मुंबईतील सीएसएमटी जवळील हज हाउस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बुधवारी रात्री इफ्तार दावतचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार दावतला दरवर्षीप्रमाणे पवार यांनी हजेरी लावली. तसेच सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. दावतसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व बांधवांचे आभारही मानले. त्यावेळी बोलताना पवार यांनी संघ परिवार व भाजपवर टीकास्त्र सोडले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2011 मध्ये गुजरामध्ये 'सद्भावना उपोषणा' दरम्यान मुस्लिमांची गोल टोपी घालण्यास नकार दिला होता. तर नुकतीच संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने इफ्तार पार्टी दिली आहे. हा संदर्भ घेत पवारांनी वरील भाष्य केले आहे. 

 

शरद पवार म्हणाले, आपल्या देशात दुर्देवाने अशा काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे देशातील बंधुत्व भावनेत कटुता आणू पाहत आहेत. काही प्रतिगामी शक्ती इफ्तार दावतचे आयोजन करत असल्याचे वर्तमानपत्रात वाचले. एका संस्थेने यावर्षी रोजा इफ्तार दावतचे आयोजन केले होते. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते इफ्तारची दावत ठेवत आहेत. या लोकांची मनं साफ नाहीत म्हणून असे प्रकार केले जात आहेत, असे टीकास्त्र पवारांनी सोडले. 

 

या इफ्तार दावतसाठी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन,  फौजिया खान, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, सचिन आहिर, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, आमदार विद्या चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे गफार मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...