आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ द्या, शरद पवारांची नवी राजकीय गुगली!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास जातवर्गांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा विचार आज समाजमान्य होतो आहे. त्यामध्ये आता शेतकरी या चौथ्या घटकाचा समावेश केला पाहिजे, असे काही जाणकार मंडळींनी सुचवले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना दिलेले आरक्षण न्यायालयातही टिकेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. 


राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी पवार यांची मंगळवारी पत्रकार परिषद झाली. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना पवार यांनी आरक्षणाची गगुली टाकल्याने राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.


शेतकरी घटकाला आरक्षण दिल्यास अनेक जातघटकांना त्याचा लाभ होईल. हे आरक्षण केवळ मराठा जातीपुरते नसेल. मुळात ते जातीच्या आधारावर असणारच नाही. ब्राह्मणांसह सर्व जाती आरक्षणाच्या परिघात येतील. मध्यंतरी पुण्यात राज ठाकरे यांनी माझी मुलाखत घेतली. त्यात माझा आर्थिक आरक्षणाला पाठिंबा असल्याचा चुकीचा प्रचार झाला. माझा सध्याच्या आरक्षणाला कधीच विरोध नव्हता नाही, असे ते म्हणाले. 

 

जिल्हा बँकांच्या नोटा बदलून द्या...

नोटबंदीच्या काळात राज्यातील जिल्हा बँकांकडील ११२ कोटींचे जुने चलन अद्यापही रिझर्व्ह बँकेने बदलून दिलेले नाही. यासाठी बँक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांना आपण भेटणार असल्याचे सांगून यानंतरही ही मागणी मान्य झाली नाही तर सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसचे पी. चिदंबरम यांना बाजू लढवण्यासाठी नेमून दाद मागू, असे पवार म्हणाले.

 

तेव्हा शिवसेना सत्तेत होतीच की...

आर्थिक आरक्षणाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार समजायला आम्हाला ५० वर्षे लागली, हा उद्धव ठाकरे यांचा आरोप खरा आहे. पण बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना सत्तेत होतीच की…. सध्या बाळासाहेबांचे चिरंजीवही सत्तेत आहेत. त्यांना अजूनही वेळ आहे, त्यांनी तो अमलात आणावा, असा टोला पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मारला.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...