आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी बॅंकांबाबत सरकार व RBI ने झिडकारल्याने सुप्रीम कोर्टात जाणार- शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नोटबंदीनंतर महाराष्ट्र, कर्नाटकसह काही राज्यांतील सहकारी बॅंकांत सामान्य लोकांनी जमा केलेली रक्कम घेण्यास सरकार व आरबीआयने नकार दिल्याने आपण सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

 

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत देशातील चलनात सुमारे 85 टक्के असलेल्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा बंद करत रद्दबादल ठरवल्या गेल्या होत्या. त्यानंतर 50 दिवसात पैसे जमा करण्याचे आवाहन सरकार व आरबीआयने केले. मात्र, सहकारी बॅंकांतील स्त्रोत न दिल्याने आरबीआयने ते पैसे जमा करून घेण्यास नकार दिला. सहकारी बॅंकांत केवायसीचे बंधनकारक नव्हते. त्यामुळे काही ब्लॅकमनी वाल्यांनी सहकारी बॅंकांत पैसा जमा केल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

 

दुसरीकडे, सहकारी बॅंकांची पाठराखण करणारे लोक व राजकीय नेते यांनी सरकार व आरबीआयचे हे म्हणणे फेटाळून लावले. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही सरकारला यावरून फटकारले होते. सहकारी बॅंका या बहुतेक ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आहेत. या बॅंका गरीब, शेतकरी व कष्टकरी वर्गाशी संबंधित आहेत. शेतक-यांची विविध बिले व विकास सोसायटीचे व्यवहार जिल्हा ग्रामीण सहकारी बॅंकांतूनच होतात असे पवार यांचे म्हणणे आहे.

 

सहकारी बॅंकांची बाजू मांडण्यासाठी शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांनी संसदेत मुद्दा उपस्थित केला. यात भाजपचे खासदारही सामील होते. सोबतच शरद पवारांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांची 4 वेळा भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. सुरूवातीला अरूण जेटली सकारात्मक होते मात्र नंतर त्यांनी हात वर केले. सहकारी बॅंकांही आरबीआयच्या वारंवार संपर्कात होत्या. मात्र, आता आरबीआयने या बॅंकांना तुमच्याकडील जुन्या नोटा नष्ट करा असे आदेश काढले आहेत.

 

आरबीआयच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील विविध बॅंकांना 101 कोटी 18 लाख रूपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी या बॅंकांच्या बाजूने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शरद पवारांचे सहकारी राहिलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम सुप्रीम कोर्टात सहकारी बॅंकांची बाजू मांडणार आहेत. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा सहकारी बॅंकांची किती आहे रक्कम...

बातम्या आणखी आहेत...