आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांची अशीही \'पॉवर\', एका तासात उभारले 5 कोटी रूपये!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार रविवारी सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दौ-यावर होते. - Divya Marathi
शरद पवार रविवारी सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दौ-यावर होते.

सातारा- दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच! असे सांगत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त माणवासियांना गावकऱ्यांना दिलासा दिला. तसेच अवघ्या एका तासात पवारांनी आपली ताकद दाखवून देत जलसंधारणाच्या कामासाठी पाच कोटींचा निधी उभारला.

 

शरद पवार रविवारी सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दौ-यावर होते. या दौ-यात त्यांनी माण आणि खटाव या दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची जाण असणाऱ्या शरद पवारांनी वॉटरकप स्पर्धेतील सहभागी विविध गावांना भेटी दिल्या. त्यावेळी सरकारच्या कामावर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही देत त्यांनी गावकऱ्यांना धीर दिला.

 

'दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच', असा दिलासा देणारे शब्द पवारांच्या तोंडून निघाले आणि गावकऱ्यांना धीर मिळाला. इतकेच नव्हे, तर अवघ्या एका तासात पवारांनी जलसंधारणाच्या कामासाठी पाच कोटींचा निधी उभारला. पवारांनी पुणे, मुंबई येथील संस्था, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना संपर्क करून मदत करण्याची विनंती केली. आणि पवारांच्या शब्दाची ताकद एका तासात दिसून आली. तसेच, संस्था आणि अनेक नेत्यांनी पवारांच्या शब्दाला मान देत निधी दिला. यावेळी गावकऱ्यांनीही पवारांचे आभार मानले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, माण- खटाव तालुक्यातील पवारांच्या दौ-यातील फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...