आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ट्रेनच्या कोचमध्ये मिळेल विमानाने प्रवास केल्याचा फील, ही आहेत यात खास फीचर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोचचे इंटिरियर विमानासारखे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इन्सेटमध्ये कोच आऊटरचे लुक... - Divya Marathi
कोचचे इंटिरियर विमानासारखे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इन्सेटमध्ये कोच आऊटरचे लुक...

मुंबई- पश्चिम रेल्वेद्वारे लवकरच मुंबई ते अहमदाबाद यांच्यात सुरू होणारी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये भारतीय रेल्वेतील सर्वात आरामदायक 'अनुभूती कोच' शी जोडले जाणार आहेत. हे कोच मुंबईत आणला गेला आहे. रेल्वेच्या चेन्नई इंटीग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ) मध्ये असे 10 कोच तयार केले गेले आहेत. एका अनुभूती कोचमध्ये 56 जागा आहेत. अशा प्रकारच्या कोचची घोषणा बजेटमध्ये करण्यात आली होती. अनुभूती कोचचे भाडे अजून ठरवले गेले नाही. कोचची ही आहेत खास वैशिष्ट्ये....

 

- वीजेची बचत व्हावी म्हणून एलईडी लाईटचा वापर 
- फिल्म पाहण्यासाठी एलसीडी स्क्रीन 
- वाचन, लेखन करण्यासाठी रीडिंग लाईट्स 
- मिनी पेंट्रीत सूप बॉयलरची सुविधा 
- बायो टॉयलेटची सुविधा 
- टच फ्री टॅप तथा सोप डिसपेन्सर 
- हॅंड ड्रायरची सुविधा 
- यूएसबी आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट्स 
- पॅत्येक सीटवर मोबाईल चार्जिंग पॉईंट्स

 

विमानासारखे असतील हे फीचर-

 

- कोचला प्लेनमध्ये वापरली जाणारी रेक्लायनर खुर्च्या लावल्या आहेत. प्रत्येक सीटच्या बाजूला अर्जेस्ट बटन लावली आहेत.
- प्रत्येक सीटच्या वर एक बेल बटन लावले आहे. ज्यामुळे तुम्ही न उठता बसून बोलू शकाल किंवा उत्तर देऊ शकाल.
- रेल होस्टेस तैनात करण्याचा रेल्वेच्या प्लॅनिंगमध्ये आहे. 
- विमानात जशी लाईट्स आपल्या गरजेनुसार कमी जास्त करण्याची सुविधा असते तसेच येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- प्रत्येक कोच ड्रायव्हर आणि गार्ड केबिनला कनेक्ट राहील. प्लेनच्या पायलटप्रमाणे प्रत्येक प्रवासी सर्व संदेश, सूचना ऐक शकतील.

 

चंडीगड शताब्दीत पहिली ट्रायल-

 

या कोचची सर्वात आधी ट्रायल चंडीगड शताब्दीमध्ये झाली होती. नंतर जयपुर शताब्दीला जोडले गेले. आता हळू हळू सर्व शताब्दी आणि राजधानी ट्रेनला एक-एक अनुभूती कोच जोडला जाणार आहे. यानंतर मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्सला सुद्धा अनुभूती कोच लावले जाणार आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रेनच्या आतील कसा आहे नजारा, फोटोज ...

बातम्या आणखी आहेत...