आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. २६ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित “संविधान बचाओ’ रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी चव्हाण यांना दिले.
शेट्टी सध्या भाजपविरोधात देशभर मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रजासत्ताकदिनी मंत्रालय ते गेटवेपर्यंत त्यांनी एका पदयात्रेचे आयोजन केले आहे. सर्वपक्षीय पदयात्रा असे या पदयात्रेचे स्वरूप असले तरी मुख्य संकल्पना शेट्टी यांचीच आहे. गुजरातमधील हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीचे शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी यांच्याबरोबरच दक्षिणायनचे गणेश देवी यांनाही शेट्टी यांनी आमंत्रण दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेट्टी यांनी बुधवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी अशोक चव्हाण यांची भेट घेतली.
विशेष म्हणजे गेली दोन दशके राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी संस्थांवर आरोप करत आकारास आली. तेच राजू शेट्टी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारशी मतभेद होताच पारंपरिक हाडवैर असलेल्या विरोधकांशी सध्या गळाभेट घेत असल्याचे दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.