आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिशिर शिंदे शिवसेनेत; म्हणाले, ‘माफ करून मला घरात घ्या !’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पूर्वाश्रमीचे शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी मनसेला साेडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून व हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी शिंदे म्हणाले, ‘मी एकदा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. चर्चा झाल्यानंतर बाहेर जाताना उद्धव यांनी त्यांचा हात माझ्या हातात दिला. त्या वेळी मला उद्धव ठाकरेंच्या हाताला बाळासाहेबांचा स्पर्श असल्याचे जाणवले. त्यानंतर मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

 

 

पूर्वीप्रमाणेच अाताही एका हाती भगवा झेंडा व एका हाती धाेंडा घेऊन अापण काम करणार अाहाेत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय अापली पाठ मातीला टेकणार नाही,’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. ‘साेशल मीडियावर काही क्लीप फिरत अाहेत. त्या वक्तव्याबद्दल सर्व शिवसैनिकांची माफी मागताे. त्यांनी ‘मला आपल्या घरात मोठ्या मनाने घरात घ्या’, अशी भावूक हाेऊन विनंतीही केली.

बातम्या आणखी आहेत...