आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर पोटनिवडणूक: मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी 12 तरुणांविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैसे वाटताना शिवसैनिकांनी पकडलेले संशयित युवक. - Divya Marathi
पैसे वाटताना शिवसैनिकांनी पकडलेले संशयित युवक.

मुंबई- पालघर लोकसभा पाेटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असताना अाता मतदारांना पैसे वाटप सुरू झाले अाहे. अशाच पैसे वाटणाऱ्या १२ जणांना शिवसैनिकांनी पकडून पाेलिसांच्या स्वाधिन केले अाहे. या सर्व तरुणांवर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे पैसे भाजपकडूनच वाटले जात       असल्याचा अाराेप करत राजेंद्र गावित यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात अाली. भाजपने मात्र या अाराेपांचे खंडन करताना हा शिवसेनेचा स्टन्ट असल्याचा प्रतिअाराेप केला अाहे.


भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या मुलाला शिवसेनेने उमेदवार दिल्यानंतर या मतदारसंघात शिवसेना- भाजपातच चांगलीच चुरस वाढली अाहे. भाजपने काँग्रेसमधून अालेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली अाहे. शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू येथील रानशेत भागात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती शिवसेनेला मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार अमित घौडा यांनी तिथे जाऊन पैसे वाटणाऱ्यांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी भाजप पदाधिकारी आंबोरे यांनी पैसे वाटण्यास सांगितल्याचे या तरुणांनी सांगितले. ही बातमी कळताच एकनाथ शिंदे, अनिल देसाई, संजय राऊत या शिवसेनेच्या नेत्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा असल्याने सर्व नेते डहाणूत हाेते. शिवसैनिकांनी पकडलेल्या प्रत्येक तरुणांकडे ३५ पाकिटे हाेती, त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये होते. 

बातम्या आणखी आहेत...