आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांसाठी शिवसेना व भाजपत लढत; 25 जूनला मतदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान परिषदेच्या ४ जागांसाठी २५ जूनला मतदान होणार आहे. काँग्रेसने एकही उमेदवार दिला नसून राष्ट्रवादी एका जागी लढणार आहे. त्यामुळे चारही ठिकाणी खरी लढत शिवसेना व भारतीय जनता पक्ष या मित्रपक्षातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  


मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्य राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जनता दलाचे कपिल पाटील, भाजपचे निरंजन डावखरे आणि डॉ. अपूर्व हिरे यांचा २ वर्षांचा कार्यकाल संपत असल्यामुळे या ठिकाणी निवडणूक होत आहे.   


मुंबई पदवीधर मतदारसंघातून या वेळी शिवसेनेने डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारली असून बोरिवलीचे पक्ष विभागप्रमुख विलास पोतनीस यांना दिली अाहे. भाजपकडून अमित मेहता मैदानात आहेत. नाशकात भाजपचे अनिकेत पाटील आणि हिंदुस्तान जनता पार्टीचे सुरेश पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने येथे उमेदवार दिला नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजी शेंडगे तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अनिल देशमुख आणि जनता दलाचे कपिल पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे. कपिल पाटील गेल्या दोन वेळेला या मतदारसंघातून निवडून आले आहेत. काँग्रेसने मित्रपक्षांना पाठिंबा दिला असून धर्मनिरपेक्ष मतांत फाटाफूट होऊ नये, म्हणून उमेदवार दिले नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...