आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी शिवसेना-भाजपची युती; अाघाडीचे घाेडे मात्र अडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ मुंबई - यापुढे सर्वच निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घाेषणा करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या ६ जागांसाठी मात्र भाजपशी युती करण्यास राजी झाले. दुसरीकडे, परभणी-हिंगाेली आणि लातूर-उस्मानाबाद-बीड या २ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अाघाडीचे गाडे अडले अाहे.

 

‘या दाेन्ही जागा राष्ट्रवादीच्याच आहेत, फक्त दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख यांच्यासाठी लातूरची जागा काँग्रेसला सोडली होती. या जागा आम्हाला परत मिळाव्यात, त्यानंतर आघाडीचा निर्णय होईल,’ असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशकात सांगितले, तर लातूर, परभणीच्या जागांसाठी काँग्रेसही अाग्रही अाहे.


नाशिक आणि लातूर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने निष्ठावंतांना डावलून अायात उमेदवारांना तिकीट दिले. शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेल्या शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादीने नाशकातून उमेदवारी दिली. गेल्या वेळी राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांच्याविरुद्ध सहाणेंनी कडवी झुंज दिली होती. मात्र, ते पराभूत झाले हाेते. निवडणुकीनंतर ५ वर्षे सहाणे-जाधव यांची न्यायालयीन लढाई सुरू हाेती. दुसरीकडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ व लातूरचे भाजपचे नेते रमेश कराड यांना राष्ट्रवादीत अाणून धनंजय मुंडे यांनी पंकजांना धक्का दिला. राष्ट्रवादीने कराड यांना लातूर-उस्मानाबाद-बीड मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजप उमेदवारी देत नसल्याने ते नाराज हाेते. कराड यांच्याविराेधात भाजपने राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांना मैदानात उतरवले अाहे. गुरुवारी ते अर्ज दाखल करतील. धस यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, शिवसेना-भाजप प्रत्येकी तीन जागा लढवणार...


 

बातम्या आणखी आहेत...