आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेतृत्त्व अजूनही जनतेपर्यंत पोहोचलेच नाही; मनाेहर जाेशी यांनी टाेचले कान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘इतर राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेवर येतात मग शिवसेना अाजवर महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेवर का अाली नाही, याचे उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला. पण उत्तर सापडले नाही. उत्तम नेतृत्व असूनही स्वत:च्या जाेरावर अापण सत्तेत का आलो नाही याचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्राच्या अनेक भागात शिवसेना अजून पोहोचली नाही. आपण प्रत्येक भागात पोहोचणे आवश्यक आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री मनाेहर जाेशी यांनी अापल्या भाषणात शिवसेनेचे पक्षप्रमुख व नेत्यांचे कान टाेचले. 


वर्धापन दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात मनोहर जोशी यांनी शिवसेना स्वबळावर ५२ वर्षांत सत्तेवर आली नसल्याची खंत केली. त्यानंतर भाषण करताना खासदार सावंत म्हणाले, ‘शिवसेना लोकांपर्यंत पोहाेचली नाही हा भ्रम आहे. शिवसेना लोकांच्या मनामनात पोहाेचली, पण पदाधिकारी त्यांच्यापर्यंत पोहाेचले नाहीत. प्रादेशिक पक्ष सत्तेत येण्यास त्या त्या पक्षाची राज्यातील ताकद महत्त्वाची आहे. निवडणुका जिंकायच्या असतील तर लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याची गरज अाहे. त्यासाठी शिवसैनिकांची एकजूट होणे आवश्यक आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यात एक कोटी नोंदणी करावी,’ असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

 

बातम्या आणखी आहेत...