आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, ओळख लपवण्यासाठी मृतदेह जाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- शिवसेनेच्या शहापूर तालुका उपप्रमुखाची दगडाने ठेचून हत्या करुन नतंर मृतदेह जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही हत्या गुरुवारी रात्री झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार शैलेश निमसे (वये 45 वर्षे)  हे शहापूर येथील शिवसेनेचे तालकाउप्रमुख होते. अज्ञात लोकांनी त्यांची भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो पेटवून दिला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला. निमसे यांचा मृतदेह भिवंडी  शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे. निमसे यांची हत्या राजकीय वादातून किंवा पुर्ववैमनस्यातून झाली आहे याबाबत उलगडा झालेला नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन पदाधिका-यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...