आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम L&T कंपनीला, लवकरच कामाला सुरूवात होणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाची निविदा निश्चित झाली असून, येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. एलअँडटी कंपनीला हे काम देण्यात अाल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

मेटे म्हणाले, 'शिवस्मारक उभारणीत काही अधिकारी मुद्दाम खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराजांच्या पुतळ्याची उंचीही आता थोडी वाढवली असून याचे बजेटही वाढवण्यात आले आहे. राजभवनपासून 1.2 किमी तर गिरगावपासून 3.60 किमी अंतरावर 15.96 हेक्टर आकाराच्या भक्कम खडकावर हे स्मारक होईल. सभोवतालची 17.67 हेक्टरची जागा उथळ खडकाची आहे. येथे शिवाजी महाराजांचा 210 मीटर उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाईल. 

 

दरम्यान, मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करताना शिवस्मारकाचे काम झालेलेही कळणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे या कामाला लवकरच सुरूवात होईल व पुढील एक-दोन वर्षात शिवस्मारकाचे काम पूर्ण केले जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...