आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कंत्राट L& T कंपनीला, 3 महिन्यात काम सुरू होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात असे असेल स्मारक.... - Divya Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात असे असेल स्मारक....

मुंबई- अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील लेटर ऑफ अॅक्सेप्टन्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एल अँड टी कंपनीला गुरुवारी देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जागतिक कीर्तीचे स्मारक लवकरात लवकर व्हावे. यासाठी कंपनीने काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करावे, असे निर्देश या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.   


छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी एल अँड टी कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश व सुशांत शहादेव यांच्याकडे हे पत्र सुपूर्द केले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव सुमीत मलिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते. या वेळी स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण आशिषकुमार सिंह यांनी केले.  


फडणवीस म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या १५ वर्षापासून छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. हे सरकार आल्यानंतर  विनायक मेटे यांना स्मारक समितीचे अध्यक्ष करून कामाला गती दिली. राज्य शासनाने अतिशय जलदगतीने काम करत या स्मारकासाठी लागणारे सर्व परवाने आणले आणि आज एल अँड टी या कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले. कंपनीने पावसाळ्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करावे. तसेच अतिशय वेगाने संपूर्ण स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. कमी कालावधीत जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे वैशिष्ट्यपूर्ण काम या कंपनीला करण्यास मिळाले आहे. स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी व सर्व परवाने मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहनत घेतली आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसे असेल अरबी समुद्रातील हे शिवस्मारक.....

बातम्या आणखी आहेत...