आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रातील शिवस्मारकाला Z++ सुरक्षा, अॅंन्टी रडार सिस्टीमसह बंकरचीही व्यवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम बहुराष्ट्रीय 'एल अॅंड टी' कंपनीला देण्यात आले आहे. शिवस्मारकासाठी जगभरातील कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, तीन कंपन्यांनीच यात रस दाखवला. तीन निविदांपैकी सर्वात कमी असलेली 'एल अँड टी' कंपनीची 3 हजार 826 कोटी रुपयांची निविदा अखेर पात्र ठरली. हे स्मारक तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

 

मुंबईतील राजभवनपासून 1.2 किमी तर गिरगावपासून 3.60 किमी अंतरावर 15.96 हेक्टर आकाराच्या भक्कम खडकावर हे स्मारक होईल. सभोवतालची 17.67 हेक्टरची जागा उथळ खडकाची आहे. येथे शिवाजी महाराजांचा 210 मीटर उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे, जो प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.

 

स्मारकाला झेड प्लस प्लस-

 

- अरबी समुद्रात उभा करण्यात येणा-या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला झेड प्लस प्लस सुरक्षा असणार आहे.
- या पुतळ्याची कडेकोट सुरक्षा राहावी यासाठी तेथे रडार यत्रंणा बँकर, स्वातंत्र सुरक्षा विभाग असेल तसेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी)चे पथक 24 तास तैनात असेल. 
- सुमारे 632 फूटाच्या उंच पुतळ्यासाठी सुमारे 400 कोटी रूपये खर्च येणार आहे. फक्त घोड्याच्या चेह-याचा पुतळा 70 फुटाचा असेल.
- मुंबईत 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेत कोणतेही कसूर राहू नये यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत आहेत. 

 

दोन टप्प्यात होणार काम-

 

- या प्रस्तावित शिवस्मारकाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम 2020 पर्यंत संपविण्याचा सरकारचा मानस आहे. 
- पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या पुळ्याचा समावेश असेल. तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, म्युझियम, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल.
- हा पुतळा उभारल्यानंतर या शिवस्मारकाला दिवसाला किमान 10 हजार लोक भेट देतील असा सरकारचा अंदाज आहे. 
- त्यानुसार त्या परिसरात सर्व पायाभूत सुविधा उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. 

 

अॅंन्टी रडार सिस्टीमची व्यवस्था-

 

- हा परिसर संपूर्ण सीसीटीव्ही कॅमे-याच्या नियंत्रणात राहणार असून अॅंन्टी रडार सिस्टीम तेथे बसविली जातील.
- अॅंन्टी रडार प्रणालीमुळे हे शिवस्मारक सॅटेलाईटवरून दिसणार नाही. या यत्रंणेमुळे दहशतवादी हल्ले रोखले जाऊ शकतील. 
- याचबरोबर तेथे परमनंट बंकर बसविली जातील जेणे करून आपत्कालीन स्थितीत तेथे शत्रूंवर हल्ला करणे शक्य होईल. 
- याशिवाय नॅशनल सिक्युरिटी गार्ड, मुंबई पोलिस व कोस्ट गार्ड यांची एकत्रित टीम या स्मारकाचे रक्षण करेल.
- या तिन्ही यत्रंणावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र सुरक्षा अधिका-यांची समिती गठित केली जाणार आहे.

 

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून  2004 साली घोषणा-

 
 - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने शिवरायांचे स्मारक उभारण्याची घोषणा 2004 मध्ये केली होती. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. 
- मात्र त्याला क्रेंदातील पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी न दिल्याने हा प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होता. 
- अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याठीच्या सर्व परवानग्या व मंजुरी मोदी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्या होत्या.
- आता या प्रकल्पासाठी विविध विभागांकडून एकूण 12 ना हरकत दाखले मिळाले आहेत.


काय वैशिष्ट्ये आहेत या शिवस्मारकाची-

 

- जगातला सर्वात उंच अश्वारूढ पुतळा असून त्याची उंची 210 मीटर म्हणजेच 632 फूट इतकी असेल.

- अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याची उंची 309 फूट असून त्याच्या दुप्पट उंचीचा हा पुतळा असेल.
- शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनांची माहिती देणारे कलादालन
- वेगवेगळ्या आकाराचे दोन थिएटर्सही उभारणार
- एक्झिबिशन सेंटर
- जगातले सर्वात मोठे सागरी मत्स्यालय
- महाराजांचा जीवनपट आणि महाराष्ट्राचा इतिहास उलगडणारा लेझर शो
- सर्व सुविधा असलेले उद्यान

 

कसे असेल अरबी समुद्रातील हे शिवस्मारक-

 

- या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या सुविधा उपलब्ध असणार आहे.

- जलदुर्गाच्या तटबंदीला साजेशी अशी या स्मारकाची भिंत असणार आहे, तशा पद्धतीचे प्रवेशद्वारही असणार आहे.
- स्मारकात प्रवेश केल्यावर राज्याची कुलदैवत आणि छत्रपती यांचे आदरस्थान असलेल्या तुळजाभवानीचे भव्य मंदिर असणार आहे.
- शिवाजी महाराज यांच्या जन्मापासूनचे राज्याभिषेकापर्यंत घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावे साकारले जाणार आहेत. त्यानंतर शिवकाल उलगडवून दाखवणारे मोठे कला संग्रहालय आणि ग्रंथालयही असेल.
- शिवस्मारकात अॅम्पीथिएटर, साउंड अँड लाईट शो, थ्री डी आयमॅक्स थिएटर असेल. त्याचबरोबर अत्यंत आकर्षक असे मत्सालय या ठिकाणाची शोभा वाढवेल. 
- एकाच वेळी जास्तीत जास्त दोन हजारपेक्षा जास्त पर्यटकांना सामावून घेण्याची या स्मारकाची क्षमता असणार आहे. तसेच पर्यटकांसाठी सुसज्ज अशा रेस्टांरंटची व्यवस्थाही असणार आहे
- आणीबाणीच्या वेळी उपचार करता यावेत यासाठी छोटेखानी हॉस्पिटलदेखील स्मारकाच्या ठिकाणी असणार आहे.
- पर्यटकांच्या बोटींना सामावून घेण्यासाठी दोन मोठ्या जेट्टीबरोबर हेलिपॅडचीही सुविधा असणार आहे
- सर्वात मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे महाराजांचा 210 मीटर उंचीचा पुतळा, जो प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत. 
- या पुतळ्याच्या आतमध्ये लिफ्टची सुविधा असणार असून त्यामधून स्मारकाचे, मुंबईचे अनोखे दर्शन घेता येणार आहे.
- सर्वात मुख्य म्हणजे स्मारक जरी समुद्रात असले तरी पावसाळ्यासह 12 महिने स्मारकाला भेट देता येईन अशी व्यवस्था केली जाणार आहे. 

 

पुढे स्लाईडद्ववारे पाहा, कसे असेल हे शिवस्मारक व त्याची काय आहे वैशिष्ट्ये...

बातम्या आणखी आहेत...