आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर शिवसेनेने पुन्हा एकदा सामनातून निशाना साधला आहे. तोगडियांचे अश्रू हिमतीचे की भीतीचे, असा प्रश्न विचारत शिवसेनेने मोदी व शहा यांनी पुढे येऊन याबाबत खुलासा करायला हवा, असे म्हटले आहे.
नको असलेली माणसे ‘गायब’ करण्याचे प्रकार
नको असलेली माणसे ‘गायब’ करण्याचे प्रकार रशिया व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीत घडले आहेत. आणीबाणीत राजकीय विरोधकांना ‘पंगू’ करण्यासाठी शासन यंत्रणेने गुंडगिरी केली व त्यास इंदिराजींचे बळ मिळाले, पण हिंदुस्थानात आता हिंदुत्ववाद्यांनाच भय व दहशत वाटत असेल तर मोदी व शहा यांनी पुढे येऊन खुलासा करायला हवा, असे शिवसेनेने म्हटले आहे. नवी राजवट आल्यापासून लालकृष्ण आडवाणींसह अनेकांची ‘वाचा’ गेली आहे. हे भय आहे की मौन आहे हादेखील एक प्रश्न आहेच, पण प्रवीण तोगडियांनी जे घडले त्यास ‘वाचा’ फोडली आहे. मात्र त्यांचे अश्रू हिमतीचे नसून भीतीचे आहेत. देश भयाच्या सावटाखाली आहे काय? असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात
सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठ न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात देशासमोर मन की बात मांडली. त्या धक्क्यातून लोक अद्यापि सावरलेले नाहीत. तोच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी अश्रू ढाळत अस्वस्थ मनाने विस्फोट केले आहेत. ‘माझ्या एन्काऊंटरचा डाव होता, पण ईश्वरीकृपेने मी बचावलो आहे,’ असे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्षांनी ‘मीडिया’समोर येऊन सांगितले. तोगडिया यांनी मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. चार न्यायमूर्ती त्यांची घुसमट व न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पर्दाफाश करण्यासाठी लोकांसमोर आले तेव्हा त्यांना काँग्रेसचे एजंट व राष्ट्रविरोधी ठरविण्याचा प्रचार सुरू झाला. तो अद्यापि थांबलेला नाही. त्यामुळे प्रवीण तोगडिया यांना कोणती ‘उपाधी’ बहाल होते तेच आता पाहायचे. शिवसेना ही एक प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आमची तलवार नेहमीच सज्ज असते. हिंदुत्वाच्या लढाया आम्ही गनिमी पद्धतीने कधीच लढलो नाही. आमच्यासाठी हिंदुत्व हा खेळ किंवा राजकारण नसून ‘राष्ट्रधर्म’ आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.