आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारची कुवत नसेल तर शिवसेना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारेल- ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई विमानतळासमाेरील शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करताना उद्धव ठाकरे. - Divya Marathi
मुंबई विमानतळासमाेरील शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करताना उद्धव ठाकरे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती रविवारी शिवसेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभरात साजरी करण्यात अाली.  मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अाहे, त्यासमाेर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. एका बाजूला महाराजांची मेघडंबरी आणि समाधी असा भव्य सेट तयार करण्यात आला आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात अाला. या वेळी ठाकरेंनी सरकारवर टीका केली. ‘गेली काही वर्षांपासून शिवजयंतीला माेठ्या संख्येने शिवभक्त इथे जमतात. आमचे महाराज इथे एकटेच उन्हातान्हात उभे करुन ठेवले आहेत. मात्र आता आम्ही हे पाहू शकत नाही, आमच्याकडून ते सहन होणार नाही. सरकार, विमानतळ प्राधिकरणाकडे अाम्ही वारंवार या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्यावर रायगडाप्रमाणे छत्र उभारण्यासंदर्भात पाठपुरावा केला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. जर तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना व शिवप्रेमी जनता येथील छत्रपतींच्या डोक्यावर छत्र बसवेल,’ असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या कार्यक्रमाचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...