आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी; अनंत गिते, अडसूळ, खैरेंसह एकनाथ शिंदेंचीही निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेच्या नेतेपदी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची अखेर वर्णी लागली आहे. सोबतच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुधीर जोशी यांचेही नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार चंद्रकांत खैरे आदींची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेआकराच्या सुमारास शिवसेनेच्या कार्यकरिणीत हा ठराव मंजूर करण्यात आला. आजच्या कार्यकारिणी सभेत उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा अपेक्षित अशी पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली.

 

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी सभा आज सकाळी दहा वाजता सुरू झाली आहे. या सभेसाठी वरळीचे सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलाचा संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. अनेक महत्त्वाचे ठराव आणि घोषणांबरोबरच 2019 च्या निवडणुकीचे रणशिंगही आजच्या कार्यकारिणी सभेत फुंकले जाणार आहे. मुंबई, महाराष्ट्रासह भारतातीलच नव्हे, तर देश-विदेशांतील शिवसेनेचे प्रतिनिधीही या सभेला उपस्थित आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या घडामोडीकडे राजकीय पक्षांसह मिडियांचे लक्ष वेधले आहे.

 

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे नेतेपदी- 

 

- कार्यकारिणीत कोणती घोषणा होणार, कोणते राजकीय ठराव, संघटनात्मक ठराव होणार याबद्दल शिवसैनिकांसह प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्षांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. 
- 2019 च्या निवडणुकीचे रणशिंग कार्यकारिणीत फुंकले जाणार असल्याने राजकीय क्षेत्रातही कमालीचे औत्सुक्य आहे. 
- राजकीय, सामाजिक आणि आर्थिक ठरावही यावेळी मांडले जातील, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. 
- युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी वर्णी लागली आहे. सोबतच मनोहर जोशी, सुधीर जोशी यांचे नेतेपद कायम राहिले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाला एका गटाने विरोध केल्याने त्यांचे नाव मागे पडले.

 

उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड अपेक्षितच-

 

- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दर पाच वर्षांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होते. 
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून होणारी ही सभा सकाळी 10 वाजता सुरू झाली. 
- आजच्या कार्यकारिणी सभेत उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा अपेक्षित अशी पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली.
- या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व शिवसेना नेते, उपनेते, सचिव, जिल्हाप्रमुख, प्रमुख पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती आहे. फक्त निमंत्रितांनाच या कार्यकारिणीला प्रवेश दिला गेला आहे.

 

उद्धव ठाकरे 26 जानेवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर-

 

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी 26 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 
- या दौऱ्यामध्ये ते आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे दर्शन घेतील. तसेच कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आणि उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
- उद्धव ठाकरे यांचा हा एकदिवसीय दौरा असणार आहे. या दौऱ्यात सकाळी साडेअकरा वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

- दुपारी 2 वाजता ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे दर्शन घेतील. 
- त्यानंतर सवादोन वाजता राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...