आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत शिवसेनेच्‍या माजी उपशाखाप्रमुखावर झाडल्‍या गोळ्या, 15 दिवसांत 4 शिवसैनिकांची हत्‍या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  मालाडमधील शिवसेनेच्या शाखा क्रमांक ३९ चे माजी उपप्रमुख सचिन सावंत यांची रविवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गाेळ्या झाडून हत्या केली. कुरारच्या गोकुळनगर भागात दुचाकीवर अालेल्या अाराेपींनी  गाेळीबार केल्यानंतर सावंत रक्ताच्या थाराेळ्यात पडले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली.


गेल्या १५ दिवसांत तीन घटनांत राज्यात चार शिवसैनिकांची हत्या झाली आहे. ७ एप्रिल राेजी नगरमधील केडगाव परिसरात शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा गाेळ्या घालून व काेयत्याने वार करून भरदिवसा खून करण्यात अाला हाेता.  २० एप्रिल राेजी भिवंडी तालुक्यातील शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांचीही हत्या करून त्यांचा मृतदेह जाळून टाकण्यात अाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...