आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील देशद्रोही युती तुटली, याचा आम्हाला आनंद आहे : शिवसेना नेते संजय राऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे, ही युती देशद्रोही होती, अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपने मंगळवरी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. या प्रर्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.


सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान, केंद्र सरकारकडून रमजानच्या महिन्यात काश्मीरमध्ये शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधातील सर्व कारवाया थांबवण्यात आल्या होत्या. ही मुदत संपल्यानंतर काल पुन्हा लष्कराच्या ऑल आऊट मोहिमेला सुरुवात झाली. यामुळे भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव निर्माण झाला आणि भाजपने मुफ्तींच्या सरकारचा पाठींबा काढून घेत युतीतून काडिमोड घेतला. तसेच जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणीही यावेळी भाजपकडून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...