आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना विभाग प्रमुखाने गळफास घेऊन संपविले जीवन, कारण गुलदस्त्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भिवंडीतील श्रीरंगनगर भागातील शिवसेना विभागप्रमुख श्रावणकुमार राजमौली मारता (वय 32) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एक नृत्य कलावंत म्हणूनही त्यांची भिवंडी परिसरात ओळख होती.

 

सहा महिन्यापूर्वी झालेल्या भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत श्रावणकुमार यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे गेले काही दिवस ते निराश होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भिवंडी पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी त्यांच्यावर भिवंडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...