आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी गोरखपूर जिंकू शकले नाहीत मग पालघर काय घंटा जिंकून देणार- शिवसेनेची पोस्टरबाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला आहे. प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारासाठी पाचारण केले आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी यूपीच्या मुख्यमंत्र्यांना प्रचाराला बोलावल्याने शिवसेनेने भाजपवर जहरी टीका केली आहे. 

 

योगी आदित्यनाथ यांना भाजपने प्रचाराला बोलावल्यानंतर शिवसेनेने पालघर भागात पोस्टरबाजी करत, जे स्वत:चा गोरखपूर लोकसभा मतदारसंघ जिंकू शकले नाहीत ते पालघर काय घंटा जिंकून देणार? अशी विचारणा केली आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, शिवसेनेकडून कसा केला जातोय प्रचार....

बातम्या आणखी आहेत...