आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर लोकसभा पोटनिवडणूक: श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेने निर्णय जाहीर केला नसला, तरी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश मात्र देण्यात आले अाहेत. मंगळवारी दुपारी वनगा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत वनगा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे.  


भाजपचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना नुकतेच शिवसेनेत घेतले आहे. त्यामुळे त्यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल हे पक्के होते. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची पालघरच्या उमेदवारीबाबत मातोश्रीवर सोमवारी बैठक झाली. बैठकीला संजय राऊत, एकनाथ शिंदे हे नेते हजर होते.

 

उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर भाजप नाराज   
पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी पालघरच्या शिवसैनिकांनी केली होती. त्याला उद्धव यांच्याकडून दुजोरा मिळताच भाजपने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या वाट्याची ही लोकसभा जागा आहे, तेथे दिवंगत भाजप खासदाराच्या घरातील व्यक्तीस शिवसेना उमेदवारी देत असल्याने संघर्ष पेटण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...