आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACCIDENT: सिंधुदुर्ग-तिलारी घाटाजवळ दरीत कोसळली कार, 5 युवकांचा जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधूगुर्ग - कोदाळी येथील सनसेट पॉइंट पाहण्यासाठी गेलेल्या 5 युवकांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अतिशय धोकादायक वळण तिलारी घाटाजवळून जात असताना त्यांची कार खोल दरीत कोसळली. हे युवक रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी वॅगन आर या कारने गेले होते. परंतु, त्यांची ही कार 100 फूट खोल दरीत पडली. या दरीतून युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ पोलिसांची मदत करत आहेत. 


राज्यातील सर्वात घातक वळणांपैकी एक म्हणून तिलारी घाट ओळखला जातो. सुमारे सात किलोमीटरचा हा घाटरस्ता अनेक घातक वळण आणि चढ-उतारांनी भरलेला आहे. त्यामुळेच, या घाटाला अपघातांचे घाट असेही म्हटले जाते. तिलारी घाटात प्रत्येक ठिकाणी नागमोडी वळ आहेत. जवळपास 20 नागमोडी वळणांपैकी फक्त 4 ते 5 वळण नवख्यांना पार करता येतील. मात्र, उर्वरीत वळणांवर अनुभव नसलेला चालक जाऊ शकत नाही. संपूर्ण घाट रस्ता अवघा तीन ते चार मीटर इतकाच रुंद आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...