आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटीची मेपासून स्मार्ट कार्ड कॅशलेस योजना, सुट्या पैशांची अडचण होणार दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एसटी महामंडळ येत्या १ मेपासून कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना सुरू करत आहे. प्रवासी आणि कुटुंबीयांना योजनेचा लाभ घेता येईल. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत घोषणा केली होती. चालक व प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून अनेकदा भांडणे होतात. त्यामुळे एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. 


प्रवाशांंना ५० रुपयांचे स्मार्ट कार्ड घेऊन त्यावर सुरुवातीला किमान ५०० रुपये इतकी रक्कम रिचार्ज करावी लागेल. त्यानंतर पुन्हा १०० रुपयांच्या पटीत यामध्ये रक्कम भरावी लागणार आहे. एसटीच्या साध्या, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध अशा बसमधून प्रवास करता येईल.

बातम्या आणखी आहेत...