आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अच्छे दिन’ची ही घोषणा मोदींवरच उलटेल- सोनिया; 2019 मध्ये यूपीएच्‍या सत्तेचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2018 मध्ये सहभागी झालेल्या सोनिया गांधी.... - Divya Marathi
इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2018 मध्ये सहभागी झालेल्या सोनिया गांधी....

मुंबई- काँग्रेस अध्यक्षपद सोडल्यानंतर प्रथमच सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे जाहीर भाष्य केले. मोदी सरकारने दिलेली ‘अच्छे दिन’ची घोषणा त्यांच्यावरच उलटेल, असा दावा करून वाजपेयी सरकारवर शायनिंग इंडियाची घोषणा अशीच उलटली होती, असे सोनिया म्हणाल्या.


रोजगार देऊ, १५-१५ लाख रुपये खात्यात देऊ अशा घोषणा करणाऱ्या भाजपने केले काहीच नाही. म्हणून लोकांत प्रचंड नाराजी आहे. या स्थितीत २०१९ मध्ये एनडीएला आम्ही पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही. काँग्रेस आघाडी सत्तेत येईल, असे सोनिया म्हणाल्या. देशात धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन व्हावी, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 

वाजपेयी बरे होते...
यापूर्वी वाजपेयी सरकार होते. त्यांच्या अनेक धोरणांशी काँग्रेस सहमत नव्हती. मात्र, वाजपेयींच्या नेतृत्वाखाली त्या काळात संसदीय परंपरांचा योग्य पद्धतीने सन्मान केला जात होता, अशा शब्दांत सोनियांनी तत्कालीन एनडीए सरकारचे कौतुक केले. 

बातम्या आणखी आहेत...