आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी सोनिया गांधी आज मुंबईत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया गांधी आज सायंकाळी मुंबईत येत आहेत. - Divya Marathi
सोनिया गांधी आज सायंकाळी मुंबईत येत आहेत.

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी मुंबईत येत असून, आज सायंकाळी त्यांची भेट घेणार आहेत.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार पतंगराव कदम यांच्यावर मागील आठवड्यापासून मुंबईतील लिलावतीत उपचार सुरू आहेत. कदम यांच्या किडनी निकामी झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच लिलावतीत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सिंगापूर दौ-यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित खुद्द सोनिया गांधी या मुंबईत येऊन कदम यांच्या तब्बेतीची विचारपूस करणार आहेत.  

बातम्या आणखी आहेत...